Ad will apear here
Next
चार वर्षांच्या ‘सह्याद्री’ने सर केला ‘लिंगाणा’


पुणे :
शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्याचे अत्यंत महत्त्वाचे शिलेदार म्हणजे गड-किल्ले. गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचा संकल्प आज अगदी प्रत्येकाने करण्याची गरज आहे. या बाबतीत पिंपरी-चिंचवडमधील सह्याद्री नावाच्या चार वर्षांच्या चिमुकलीने एक आदर्श घालून दिला आहे. एवढ्या कमी वयात तिने असा संकल्प तर केला आहेच; पण ती स्वतः आई-वडिलांबरोबर गड-किल्ले सर करते आहे. एक जानेवारी २०२० रोजी तिने रायगड जिल्ह्यातील सुमारे तीन हजार फूट उंचीचा लिंगाणा किल्ला सर केला.  

लिंगाणा हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला, अंगावर काटा आणणारा किल्ला. मोऱ्यांचा पराभव केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड आणि राजगडाच्या मध्ये हा किल्ला उभारला. तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोटे, सोसाट्याचा वारा, अशा अनेक अडथळ्यामुळे आव्हानात्मक असणारा हा किल्ला गिर्यारोहकांना रॅपलिंगद्वारे सर करावा लागतो. त्यामुळेच हा किल्ला सर करणे हे ऐऱ्यागैऱ्याचे काम नव्हे; पण चार वर्षांच्या सह्याद्री भुजबळने तो लीलया सर केलाय. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इतिहासाची साक्ष देणारा लिंगाणा सर करून या चिमुकल्या रणरागिणीने गडकिल्ल्यांचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे. 

सह्याद्रीचे वडील महेश भुजबळ यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकतानाच गड-किल्ले अनुभवण्याचा नाद लागला. त्यांच्या आजोबांनी त्यांना ती आवड लावली. विवाह झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरीदेखील त्यांच्यासोबत फिरू लागल्या. मुलगी झाली, तर तिचे नाव सह्याद्री ठेवायचे असे महेश यांनी आधीच ठरवले होते. त्यामुळे मुलीचे नाव सह्याद्रीच ठेवले. आणि तिला तिच्या वयाच्या नवव्या महिन्यापासूनच त्यांनी गड-किल्ले सर करण्याचे बाळकडू द्यायला सुरुवात केली. 
ती नऊ महिन्यांची असताना महेश आणि ज्ञानेश्वरी यांनी तिला रायगडावर नेले आणि महाराजांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर तिला ते अनेक ठिकाणी घेऊन गेले. चार वर्षांच्या सह्याद्रीने आतापर्यंत रायगड, लोहगड, सिंहगड, तुंग, हडसर, शिवनेरी, जंजिरा, सुधागड, पन्हाळा, मल्हारगड, राजमाची, तोरणा, राजगड आणि आरा लिंगाणा अशा अवघड चढाया पूर्ण केल्या आहेत.



त्यामुळेच तिला कमी वयात ही आवड लागली आणि इतिहास म्हणजे काय हे माहिती नसण्याच्या वयातच तिने गड-किल्ले संवर्धनाचा संकल्प केला आहे. त्या दृष्टीने तिची वाटचालही सुरू आहे. तिचा आणि तिच्या आई-वडिलांचा हा उपक्रम प्रेरणादायी आहे. 

(चित्तथरारक व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZVKCI
Similar Posts
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ पुणे : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेचा तीन विरुद्ध दोन गुणांनी पराभव करून अमनोरा महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपले नाव कोरले. अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेत असलेल्या या दोन्ही मल्लांनी असंख्य कुस्तीशौकिनांना थरारक अनुभव दिला. या लढतीत
राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादची ऋतुजा बक्षी विजेती पुणे : अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेच्या वतीने, पुणे जिल्हा बुद्धिबळ  संघटनेतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय मानांकन खुला गट राज्य निवड चाचणी फिडे रेटिंग स्पर्धा नुकतीच पुण्यात पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून २३३ खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत औरंगाबादची ऋतुजा बक्षी प्रथम क्रमांकाची विजेती ठरली
अझर गोट्या इलेव्हन संघाने जिंकला स्वच्छता करंडक पुणे : पुणेकरांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने माय अर्थ फांउडेशन आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अझर गोट्या इलेव्हन या क्रिकेट संघाने हा ‘स्वच्छता करंडक’ जिंकला.
सिंधी प्रीमियर लीग क्रिकेट रंगणार दोन डिसेंबरपासून पिंपरी : ‘देशभरात विखुरलेला सिंधी समाज एकत्रित यावा, तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून द्यावे, तसेच मोबाइल-इंटरनेटच्या जाळ्यात न अडकता मैदानावरील खेळण्याला प्राधान्य द्यावे यासाठी आयोजित केली जाणारी सिंधी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा यंदा दोन डिसेंबर ते १८ डिसेंबर २०१९ या कालावधीत पिंपरी येथे रंगणार आहे. पिंपरी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language